Thursday, June 20, 2024
Homeक्राइमधक्कादायक .. बायकोसोबतच्या भांडणाच्या रागातून जन्मदात्या बापानेच दोन लेकरांना विहिरीत टाकल्याने दोन्ही...

धक्कादायक .. बायकोसोबतच्या भांडणाच्या रागातून जन्मदात्या बापानेच दोन लेकरांना विहिरीत टाकल्याने दोन्ही लेकरांचा मृत्यू…

नवऱ्याने जीव द्यायचा केला प्रयत्न.. भांडण झालं बायकोसोबत ! जीव गेला मात्र निष्पाप लेकरांचा

कर्जत -अळसुंदा ( ता.कर्जत) बायको सोबतच्या भांडणातून नवऱ्याने दोन पोरांना विहिरीत टाकल्याने चिमुकल्यांचा मृत्यू तर नवऱ्याने जीव द्यायचा प्रयत्न केला असून भांडण झालं बायकोसोबत ! जीव मात्र निष्पाप लेकरांचा गेला आहे.

कर्जत तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आरोपी बाप बचावला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.(shocking.. father throwing two children into a well due to quarrel between wife and husband…)

आई-वडील आपल्या लेकरांसाठी जीवाचे रान करतात, त्यांच्यावर जरासा ओरखडा येऊ नये म्हणून कष्ट करतात, आपल्या मुलांना जीवापाड प्रेम करतात, मात्र पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने समाजातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.(Ahmadnagar Crime News)

कर्जत तालुक्यातील अळसुंदा येथे शेतातील विहीरीत दोन बालकांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऋतुजा गोकुळ क्षीरसागर (वय ८ वर्षे) व वेदांत गोकुळ क्षीरसागर (वय ४ वर्षे) अशी या निष्पाप बालकांची नावे आहेत.( Crime News)

याबाबत पोलिस पाटील विजय अनारसे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली की, रविवारी (दि.६) दुपारी नितीन सीताराम अनारसे यांनी फोन करून माहिती दिली की गोकुळ क्षीरसागर यांच्या निबे रोडलगत असणाऱ्या शेतातील विहिरीत मुलीचे सैंडल दिसत आहेत.(Crime News)

त्यानुसार विजय अनारसे तसेच गावातील विभीषण अर्जुन अनारसे, सागर हनुमंत अनारसे, धनंजय नामदेव अनारसे, दिलीप चंद्रभान साळुंके, दत्तात्रय मुरलीधर जाधव यांच्यासह घटनास्थळी गेले.( Ahmadanagar Crime News)

सदर विहिरीतील पाण्यात ऋतुजा व वेदांत पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने त्यांना पाण्यातून वर काढून रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आणले. तेथील डॉक्टरांनी दोन्हींना तपासून ते मयत असल्याचे सांगितले,गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले.( Ahmadnagar Police)

पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला (shocking.. father throwing two children into a well due to quarrel between wife and husband)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!