Monday, October 14, 2024
Homeक्राइमधक्कादायक पुण्यात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला गाडले, ३० जणांनी जेसीबीच्या साहाय्याने...

धक्कादायक पुण्यात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला गाडले, ३० जणांनी जेसीबीच्या साहाय्याने टाकली माती 

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.भोर तालुक्यात बुधवार ( ता.२९) रोजी राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून शेतकर्‍याचा एकवीस वर्षीय मुलीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यामुेळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणी ज्या तरुणीवर हल्ला झाल्या ती तरुणी प्रणाली बबन खोपडे ( वय.२१) रा.कोंढावळे खुर्द, ता.राजगड व तिची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

मात्र याबाबत वेल्हे पोलिसात अद्यापही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ बाबत तक्रारदार मुलीची आई कमल बबन खोपडे म्हणाल्या, मी व माझ्या दोन मुली प्रणाली व प्राजक्ता आम्ही तिघी जणी बुधवार (ता.२९)रोजी कोंढावळे खुर्द येथील

गट नंबर ११४ मधील शेतात काम करीत असताना संभाजी खोपडे याने या ठिकाणी सोबत पंधरा ते सोळा गुंड सहीत जेसीबी व ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका यावेळी माझी मुलगी प्रणाली ही विरोध करत असताना तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला घटनेचे गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप करीत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले या प्रकरणी प्रणाली व तिची आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रारी अर्ज घेतला असून अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली.

या घटनेमध्ये मुंबई शिवडी येथील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैय्या घटनास्थळी उपस्थित होता . याने या ठिकाणी दहशत निर्माण करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला असून संबंधित मुलीला गाडण्याचा प्रयत्न करत दुसर्‍या महिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत वेल्हे पोलिसानी दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज गुरुवार (ता.३०) रोजी कमल बबन खोपडे, व प्रणाली खोपडे यांनी पुणे अधीक्षक कार्यालय येथे धाव घेतली असल्याची माहिती तक्रारदार मुलगी व तिच्या आईने दिली.याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी दोन्ही बाजू करून तक्रारी अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येतील.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!