Friday, September 13, 2024
Homeक्राइमधक्कादायक -  पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना

धक्कादायक –  पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना

पुण्यात कोयता हल्याच्या घटना वारंवार घडत असल्याते चित्र आहे. पुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे.पुण्यातील सदाशिव पेठेत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. (Pune crime news)

अल्पवयीन मुलीवर तरुणाकडुन कोयत्याने हल्ला – इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन २ तरुणांनी पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि ती मुलगी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. मुलगी आणि तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. त्याने झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडा-ओरड केला. त्यामुळे या तरुणांनी तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली. 

या प्रकरणी पीडित मुलींनी याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार नोंद करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

सदाशिव पेठेत तरुणीवर झाला होता हल्ला – तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचे प्रयत्न झाला होता. त्यावेळी काही जागरुक तरुणांनी या तरुणीचा बचाव केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीवर कारवाई केली होती. तर तरुणीचा बचाव करणाऱ्या तरुणांचं सर्वत्र कौतुक झालं.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!