Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक! पुण्यातील लोहगाव येथे क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागून अकरा वर्षीय चिमुरड्याचा...

धक्कादायक! पुण्यातील लोहगाव येथे क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागून अकरा वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

पुणे -देशात सध्या क्रिकेटचे वारे जोरदार वाहत आहे.इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे.मित्रांसोबत क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व मन सुन्न करणारी  घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली असून शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे, असं मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

सदर घटना लोहगाव येथील जगद्गुरु स्पोर्ट अकॅडमीच्या मैदानावर गुरुवारी दिनांक २ मे रोजी घडकी असून याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शौर्य उर्फ शंभू  हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव भागात शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी  मुलांसमवेत क्रिकेट खेळत होता.  खेळतांना चेंडू शंभुच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. काही वेळानंतर तो उठून उभा राहिला. 

  मात्र , वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर कोसळला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!