Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक ! जुन्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या एकुलत्या एक १० वर्षाच्या मुलाची...

धक्कादायक ! जुन्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या एकुलत्या एक १० वर्षाच्या मुलाची गळा चिरून केली हत्या

माणुसकीला व मैत्रीला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच घडली असून जुन्या भांडणाचा राग धरून एका दहा वर्षाच्या निष्पाप मुलाची गला चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे. घरी पोहचविण्यासाठी मोठ्या विश्वासाने ओळखीच्या मित्राकडे एकुलत्या एक मुलाला सोपविले होते. मात्र दहा वर्षीय निष्पाप हर्ष बिंदू यादव यांचे अपहरण करून निष्पाप जीवाची गळा चिरून हत्येच्या दुदैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

.उरण तालुक्यातील चिर्ले गावात बिंदू राम अजोर (वय-३३ वर्ष) हे गृहस्थ पत्नी आणि एकुलत्या एक असलेल्या दहा वर्षे वयाच्या हर्षसह मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहत आहेत. पत्नी गावी गेल्यावर मुलगा आणि वडील घरी एकटेच राहत होते. बिंदू हे वाहनचालक असल्याने त्यांच्या घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. त्यामुळे कामासाठी बाहेर पडल्यावर घरात मुलगा एकटाच रहात असल्याने वडिलांना काळजी होती.

यामुळे बिंदू यांनी मंगळवारी मुलाला सोबतच घेऊन कामावर निघाले होते. मात्र वाहनातून मालाची डिलिव्हरी करण्यासाठी ग्लोबल लॉजिस्टिक्स टर्मिनलमध्ये लहान मुलाला प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला. यामुळे मुलाला कुठे ठेवायचे या विवंचनेत असतानाच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी कांताराम सिताराम यादव त्याठिकाणी आलेला दिसला. कंपनीत माल उतरविण्यात उशीर होणार असल्याने बिंदू यांनी मुलगा हर्ष याला चिर्ले येथील घरी घेऊन जाण्यासाठी आरोपी कांताराम यादव याच्याकडे स्वाधीन केले.परंतु मालाची डिलिव्हरी झाल्यानंतर हर्ष घरी पोहचला की नाही याची माहिती घेण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र आरोपींकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने बिंदू राम यांनी रात्री घर गाठले. मात्र घरी ना मुलगा सापडला ना कांताराम यामुळे बिंदू राम यांनी कांताराम आणि मुलाचा रात्रभर परिसरात शोध घेतला. मात्र दोघांचाही ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान सकाळी खोपटा-पोगोटे रिलायन्स या कोस्टल रोडवरील खाडीत येथील सुरक्षा रक्षकाला एक मृतदेह आढळून आला. त्यांनी वेळ न दवडता तात्काळ उरण पोलिसांना खबर दिली.खबर मिळताच उरण पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. खाडीत धारदार शस्त्राने हर्ष याचा गळा चिरून हत्या करून टाकलेला मृतदेह आढळला. वडिल पोलीस ठाण्यात फिर्यादीसाठी पोहचले होते. तांत्रिक मदतीने पोलिसांनीही शिताफीने संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच जुन्या भांडणाचा राग धरून हर्षची हत्या केली असल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

एकुलत्या एक मुलाच्या अमानुष हत्येमुळे वडीलही पार कोलमडून गेले आहेत. एकुलत्या एक मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी दुसरे मुल होण्यापूर्वीच नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली असल्याचे दुदैवी पित्याने सांगितले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!