Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक ! (कोरेगाव भीमा) डिंग्रजवाडी येथील आय टी डब्ल्यु कंपनी जवळ भिंत...

धक्कादायक ! (कोरेगाव भीमा) डिंग्रजवाडी येथील आय टी डब्ल्यु कंपनी जवळ भिंत कोसळून दोन कामगार ठार तर तीन जखमी

चारचाकी व नऊ दुचाकी गाड्या व दोन सायकलींचे नुकसान

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंग भित सकाळी आठ साडे आठ वाजण्याच्या सुमारास पडल्याने भिंतिखाली दाबल्याने एका कामगारांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू व तीन जण गंभीर झाल्याची प्राथमिक मिळाली असून चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

   सकाळी८ वाजून ३४मिनिटांनी कंपनीची भिंत पडल्याने कामासाठी कामगार दबले गेले यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले असून काहींची तब्येत गंभीर असल्याची प्राथमिकता मिळाली असून या  दुर्घटनेत ०९ दुचाकी गाड्या तर दोन सायकली व दोन चारचाकी  गाड्या क्रं  बोलेरो एम एच १२ यु एम ३७९३ व टेम्पो ट्रॅव्हलर एम एच १४ सी डबल्यू ४४४० या गाड्यांचे नुकसान झाले.

या अपघातात राजीव कुमार यांचा मृत्यू झाला तर मंजित कुमार गंभीर जखमी असून बेशुद्ध आहे तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी  बंडू किसन विधाटे वय ३६ तक्रार दाखल दिली असून  तक्रारीनुसार मुसद्दिलाल इन्फ्रास्ट्रक्टर प्रा. लि.यांची जागा असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आळ आहे.. शोधत आलेल्या कामगारांचा भिंतिखली दबून मृत्यू झाल्याची प्राथमिक मिळत आहे.

आमदार अशोक पवार यांची तत्काळ पाहणी – आमदार अशोक पवार यांना सदर अपघाता बाबत माहिती मिळाली असता त्यांनी तातडीने भेट देत पाहणी केली. तसेच सबंधिंतावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.जखमींवर तातडीने उपचार करणायत येऊन त्याचा खर्च जे कागदोपत्री मालक असतील त्यांच्या कडून घ्यावा तसेच पुढील धोकादायक भिंत तातडीने पडणायात येण्याबाबत पोलीस वरिष्ठांशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधत सूचना दिल्या.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पि.के.(अण्णा ) गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सागर गव्हाणे, सूर्यकांत गव्हाणे व स्थानिक उपस्थित होते

 कामगारांचा भिंतिखाली कामगारांचा मृत्यू – मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही कामगार कामाच्या शोधात आले आता अचानक सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी दोन क्षणात भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जह्मी तसेच तिघे जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली.

पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार आत्माराम तळवले, पोलीस अंमलदार प्रतीक जगताप यांनी तत्काळ भेट देत स्थळा पाहणी करत पंचनामा केला.

बातमी अद्ययावत होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!