Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक ... कोरेगाव पार्क परिसरात पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

धक्कादायक … कोरेगाव पार्क परिसरात पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे – कोरेगाव पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून यामुळे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क येथे  पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.(pume Crime News)

      याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.  दत्तात्रय कुरळे  असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पोलिसांच्या एमटी विभागात (मोटार परिवहन) कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झालेल्या दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.(Pune Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!