कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील देविदास किसनराव फडतरे यांची साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे विश्वस्त पदी निवड निवड करण्यात आली असून त्यांच्यावर कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह पुणे, मुंबई व अहमदनगर येथील साईभक्त व मित्र परिवारासह पै पाहुण्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
पुणे येथील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रमेश मारुती भोसले, तर कार्याध्यक्षपदी किरण अरुण कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री साईबाबा पालखी भवन, फडके हौद येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. श्री साईबाबा पालखी सोहळा समिती यांच्यावतीने दरवर्षी पुणे शहरातून हजारो भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते शिर्डी हा पायी पालखी सोहळा करत असतात. माजी अध्यक्ष गुरुप्रसाद दगडू पगडे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नव्याने विश्वस्तांची पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १ चे दिंडी प्रमुख संजय पवळे यांची विश्वस्तपदी प्रथमच निवड करण्यात आली आहे.
नव्याने नेमणूक झालेल्या विश्वस्तांची यादी पुढीलप्रमाणे अध्यक्ष – रमेश मारुती भोसले कार्याध्यक्ष किरण अरुण कदम, – सचिव मंदार प्रभाकर शहाणे, – खजिनदार महावीर पद्माकर क्षीरसागर, विश्वस्त गुरुप्रसाद दगडू पगडे, विजय दत्तात्रय मेथे, गोकुळ दगडोबा राहूरकर, देविदास किसनराव फडतरे, संजय नरहर खरोटे, अरुणराव वीर, संजय पवळे यांची निवड करण्यात आली.
कोरेगाव भिमाचे फडतरे कुटुंबीय व्यावसायिक व शैक्षणिक कारणामुळे सध्या पुणे शहरात वास्तव्यास असून फडतरे कुटुंब पारंपारिक साई भक्त आहेत.मागील अनेक वर्षांपासून देविदास फडतरे पुणे ते शिर्डी पायी वारी करतात त्यांच्या समवेत साई भक्तांची सेवा करण्यासाठी उद्योजक प्रशांत फडतरे पायी वारी करत असतात.
पुणे ते शिर्डी पालखी सोहळ्यानिमित्त कोरेगाव भिमा येथे साईबाबा पालखी सोहळ्याला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते यावेळी काही काळासाठी साईबाबांची पालकही व साई भक्त कोरेगाव भीमा येथे विश्रामाच्या वेळी पंचक्रोशीतील अबाल वृद्ध साईभक्त पालखीचे दर्शन घेत असतात.यावेळी महाप्रसाद व साई भक्तांची फडतरे कुटुंबीय मोठ्या श्रद्धेने सेवा करतात.