Friday, May 24, 2024
Homeइतरदु्र्दैवी! शाळेत गेलेल्या नऊ वर्षीय रोहनचा साप चावल्याने मृत्यू...

दु्र्दैवी! शाळेत गेलेल्या नऊ वर्षीय रोहनचा साप चावल्याने मृत्यू…

पुण्यातील खेड तालुक्यातील पाईट मधील निवडुंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील घटना

खेड – पाईट (ता.खेड) येथील निवडुंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा लोढुंगवाडी मधील रोहन शरद डांगले (वय ९ वर्ष) हा शाळकरी मुलगा सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेला असता त्यास शाळेच्या परिसरात  सर्पदंश झाल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली असून रोहन शरद डांगले असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

रोहनला प्राथमिक उपचार करण्यासाठी पाईट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. नंतर चांडोली ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दिले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पाईट येथील ग्रामदेवतेची यात्रा सुरू असताना या घटनेने डांगले परिवारावर मोठा आघात झाला असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

उन्हाळा आणि परीक्षा यामुळे शाळा सकाळी सुरू आहेत. शनिवारी (दि २०)सकाळी शाळा भरल्यावर मधल्या सुटीला सगळे विद्यार्थी बाहेर पडले.लघुशंकेला गेल्यावर रोहनला सर्पदंश झाला. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने शिक्षकांना सांगितले. त्याला पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांना साप चावल्याचे आढळले नाही.

रोहनची अवस्था पाहून त्याला पुढे नेण्यास सांगण्यात आले. चांडोली ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करायला आणले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याची माहिती अधीक्षक डॉक्टरांनी देताच रोहनच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!