Sunday, November 3, 2024
Homeक्राइमदुर्दैवी...पोलीस भरती करणाऱ्या युवतीचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

दुर्दैवी…पोलीस भरती करणाऱ्या युवतीचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

चाफळ विभागातील जाळगेवाडी या छोट्याशा गावातील एक हुशार आणि ध्येयवेडी युवती होती. बाळासाहेब देसाई कॉलेजमधून शास्त्र शाखेतून पदवी घेऊन ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती.

पोलिस भरतीसाठी (Police Bharati) धावण्याचा सराव करून दुचाकीवरून आजोळी जात असताना डंपरच्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली. मंगल रामचंद्र जगदाळे (वय २१, रा. जाळगेवाडी, चाफळ, ता. पाटण) असे मृत तरुणीचे नाव असून, उरुल घाटातील  एका अवघड वळणावर हा अपघात झाला. 

दरम्यान, पोलिस दलात (Police bharati) भरती होऊन वडिलांच्या समोर वर्दी घालून उभी राहण्याचे स्वप्न मंगलने उराशी बाळगले होते. त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत होती. मात्र, काल मंगलवर काळाने घाला घातल्याने तिचे ते स्वप्न अपुरे राहिले. मंगल आपल्या बहिणीसह पोलिस भरतीचा कसून सराव करीत होती. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. 

तिची तब्येत ठिक नसल्यामुळे ती काल पोलिस भरतीचा सराव व अभ्यास करून आजोबा लक्ष्मण काटकर (वय ५५, रा. ठोमसे, ता. पाटण) यांच्यासोबत दुचाकीवरून आजोळी ठोमसेकडे निघाली होती. निसरे येथून उरुल घाटातून जात असताना घाटातील वळणावर उंब्रजकडे निघालेल्या डंपरने दुचाकीच्या एका साईटला धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेली मंगल जगदाळे ही रस्ताच्या मधोमध पडली व डंपरच्या चाकाखाली सापडली. यात तिचा जागेवर मृत्यू झाला, तर आजोबा किरकोळ जखमी झाले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!