Monday, June 17, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या? दिव्यांगांच्या तक्रारीची दखल घेत शिरूर गट विकास अधिकारी महेश डोके यांनी बजावली...

 दिव्यांगांच्या तक्रारीची दखल घेत शिरूर गट विकास अधिकारी महेश डोके यांनी बजावली ग्रामसेवक रतन दवणे यांना कारणे दाखवा नोटीस

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला असून याबाबत शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी ग्रामसेवक रतन दवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अपंग निधी जमा न करता खोटी आश्वासने देत  कर्तव्य पालनात कसूर, अपंगांची दिशाभूल करत त्यांना फसवण्यासाठी पदाचा गैरवापर करणे व इतर बाबींचा उल्लेख करत ग्राम सेवक रतन दवणे यांच्या विषयी व. कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीची चौकशी करावी अशा  आशयाचे तक्रार अर्ज वरिष्ठांना ईमेल करण्यात आले आहे.

    प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य सचिव , माजी मंत्री आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख , पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व गट विकास अधिकारी महेश डोके यांना याबाबत तक्रार अर्ज करण्यात आला असून संबधित ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा पुणे जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रहार क्रांती संघटनेच्या कोरेगाव भिमा येथील असे पत्रामध्ये म्हटले असून याची दखल आता वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असून गट विकास अधिकारी महेश डोके यांनी याबाबत ग्रामसेवक रतन दवणे यांना नोटीस बजावली असल्याचे सांगितल्याने या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर गंभीरपणे दखल घेतल्याचे निदर्शनास येत आहे.

ग्राम सेवक रतन दवणे यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. अपंगांचा अर्ज प्राप्त झाला असून ग्रामसेवक रतन दवणे यांच्याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात येऊन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल – गट विकास अधिकारी डोके

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!