Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमतळेगाव-न्हावरे रस्त्यावर भरधाव कार उलटून  दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव-न्हावरे रस्त्यावर भरधाव कार उलटून  दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव ढमढेरे –  शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली (हुंदाई आय 20) कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की हि कार रस्त्यावर पासुन सुमारे शंभर फुट अंतरावर जाऊन उलटली. या अपघातात चारचाकी कारचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. 

हा अपघात झाल्यानंतर बाजुलाच राहत असलेले संदीप भंडारे, योगीराज धुमाळ, सुखदेव ढोरे, पुरुषोत्तम घोलप, दीपक वडघुले, बाबासाहेब दौंडकर यांनी तातडीने ॲम्बुलन्सला कॉल करून उलटलेली कार सरळ केली व जखमी व्यक्तींना कारमधून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत केली. 

तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर दररोज अपघाताचे सत्र सुरुच आहे. या २४ किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही गतिरोधक नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने अतिशय वेगाने चालतात. तसेच या रस्त्यावर वळणे अधिक असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!