Tuesday, July 16, 2024
Homeइतरतळेगाव ढमढेरे येथे एक्टिवा गाडीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

तळेगाव ढमढेरे येथे एक्टिवा गाडीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) दि.२१ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास टाकळी भिमा गावच्या हद्दीत घोलपवाडी येथे तळेगाव ते न्हावरे रोडवर रस्त्याच्या बाजूस बाजूस उभे असणाऱ्या पासष्ट वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Accident)





याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे  रुपेश रामदास सकोरे रा.टाकळी  भिमा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश साकोरेयांचे  मामा भगवान रामभाऊ कर्पे (वय ६५ वर्षे ) हे त्यांच्या  बजाज मोटारसायकल बॉक्सर एम एच १२ यू एस ८५४६ हे  तळेगाव ढमढेरे न्हावरा रोडचे बाजुला थांबलेले असताना तळेगाव ढमढेरे बाजुकडुन ॲक्टीव्हा स्कुटी एम एच १२ यू एक ००९६ वरील चालक गुड्डू कुमार रा .पिंपळे धुमाळ , मुळ रा. देवरीया ऊत्तरप्रदेश हा दुचाकीवर भरधाव वेगात येवुन  भगवान रामभाऊ कर्पे याचे बजाज बॉक्सर गाडीला पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने  भगवान कर्पे बॉक्सर गाडीवरुन डांबरी रस्त्यावर खाली पडल्याने त्यांच्या  डोक्याला व पोटाला मार लागला होता. तर गुड्डु कुमार याचे पायाला मार लागला होता. (Road Accident)

या एली तक्रारदार यांनी मित्राच्या मदतीने तातडीने भगवान कर्पे यांना तळेगाव ढमढेरे येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन पुढील उपचारकामी वाघोली  येथील हॉस्पीटल मधील डॉक्टरांनी भगवान कर्पे यांना तपासुन परत शिक्रापुर येथे घेवुन जाणेसाठी सांगीतले त्यानंतर  ग्रामीण रुग्णालय शिक्रापुर येथे आलो त्यावेळी तेथिल डॉक्टरांनी तपासुन मयत झाले असल्याचे सांगीतले आहे.

 याप्रकरणी  गुड्डु कुमार सध्या रा. पिंपळे धुमाळ ,मुळ रा. देवरीया ऊत्तरप्रदेश याच्यावर भगवान कर्पे यांना किरकोळ व गंभीर दुखापती होवुन त्यांचे मृत्युस कारणीभुत झलेबाबत याचेविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली.या प्रकरणाचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!