Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्यातरुणांनो आत्महत्या हा पर्याय नाही, आत्महत्या करणे समाजाला व कुटुंबाला परवडणारे नाही...

तरुणांनो आत्महत्या हा पर्याय नाही, आत्महत्या करणे समाजाला व कुटुंबाला परवडणारे नाही – मंत्री तानाजी सावंत

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना भेटी प्रसंगी मंत्री सावंतांनी अश्रू अनावर,  पाच लाखांचा धनादेश देत मुलींचे स्वीकारले पालकत्व

लोणीकंद (ता.शिरूर) मराठा आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या प्रसाद देठेच्या कुटुंबीयांची मंत्री सावंत यांनी सांत्वनपर भेट घेत कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश देत तिन्ही मुलांचे पालकत्व स्विकरले तसेच  तरुणांना हात जोडून विनंती आहे, मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, आत्महत्या हा पर्याय नाही.आत्महत्या करणे समाजाला व कुटुंबाला परवडणारे नाही  तरुणांनो  शेवटपर्यंत लढा द्यायला शिका. आत्महत्या हा यावरचा पर्याय नाही. संघर्ष हा सुरूच ठेवावा लागतो. आरक्षणाचा लढा सुरूच आहे. अशी टोकाची भूमिका घेवू नका. असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लोणीकंद (ता.हवेली) येथे केले.(Tanaji sawant)

मूळचे बार्शी येथील व सध्या लोणीकंद येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रसाद भागवत देठे या तरुणाने बुधवारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेवून आपलं जीवन संपवलं. सावंत यांनी त्यांच्या पत्नी व तीन मुलांची लोणीकंद येथील घरी येवून भेट घेतली. ते पुढे म्हणाले की , आतापर्यंत अनेकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. मात्र त्यांचे कुटुंब उघडे पडले. आज त्यांची काय अवस्था आहे, हे पाहणे गरजेचे आहे. आपण दोन दिवस त्या कुटुंबीयांकडे जातो. नंतर त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही. कुटुंब उघड्यावर पडते. कोणत्याही बाबीसाठी संघर्ष करत असताना धीर ठेवावा लागतो. शेवटपर्यंत लढा द्यावा लागतो. आरक्षणाचा ही लढा सुरू आहे. तरुणांच्या अशा आत्महत्येने हा प्रश्न लगेच सुटणार नाही. समाजसेवेची आवड असणाऱ्या व झगडणाऱ्या प्रसाद सारख्या योध्याने आत्महत्या करावी ही चांगली बाब नाही. उलट अशा संघर्ष करणाऱ्या तरुणांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला पाहिजे. (Maratha Reservation)

 यावेळी, सावंत यांच्याकडून देठे कुटुंबास ५ लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत करण्यात आली. दरम्यान, या भेटीवेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. देठे कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत तिन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच, मराठा समाजातील तरुणांनी अशी टोकाची भूमिका न घेता कुटुंबाकडे लक्ष द्या, अशा घटनेमुळे कुटुंब उघड्यावर पडतात असे देखील तानाजी सावंत यांनी यावेळी म्हटले. (Manoj jarange patil)

देठे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय – मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.(मराठा आरक्षण)

यावेळी लोणीकंद ग्राम पंचायतीच्या सरपंच मोनिका कंद, उपसरंपच राहुल शिंदे माजी उपसरपंच नंदकुमार कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद माजी उपसरंपच गजानन कंद, ग्रामपचायत सदस्य डॉ सोनाली जगताप, सरस्वती दळवी, सुधीर कंद, अतुल मगर, शशिकांत कंद, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सतीश काळे, मराठा संघाचे चंद्रप्रकाश घाडगे, मराठा सेवा संघाचे व भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे प्रमोद भंडारे,  लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजाराम माळगावकर, पोलीस कर्मचारी काळे, असवले, सागर कडू व मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!