Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याडॉ कोल्हे यांच्या विजयाने वाघोली येथे शिवसैनिकांनी पेढे भरवत उधळला गुलाल

डॉ कोल्हे यांच्या विजयाने वाघोली येथे शिवसैनिकांनी पेढे भरवत उधळला गुलाल

वाघोली (ता.हवेली) राज्यभर चर्चेत व चुरशीची मानल्या शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ अमोल कोल्हे यांनी बहुमताने विजय मिळविल्याने वाघोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून फटाकड्यांची आतषबाजी करत गुलाल उधळत ढोल, ताशा व तूतारीच्या निनादात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत डॉ अमोल कोल्हे यांचा विजयोस्तव साजरा करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ असलेले आमदार अशोक पवार यांनी एकत्रितपणे एकदिलाने काम केल्याने हवेली तालुक्यातील वाघोली येथे मतदान मिळाले व कोल्हे यांचा विजय झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. संसदरत्न डॉ अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे समजताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ वाघोली येथील नेते व कार्यकर्त्यांनी फटाकड्यांची आतषबाजी करत गुळाला उधळला व एकमेकांना पेढे भरवले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक व पदाधिकारी यांनी पुणे जिल्हा शिवसेना उपप्रमुख संजय सातव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे जोरदारपणे काम करून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात मतांची मोठी आघाडी घेण्यात सिंहाचा वाटा उचलला यामध्ये शिवसेना जिल्हा समन्वयक राजेंद्र पायगुडे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख युवराज दळवी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड ,माजी उपसरपंच वसंत जाधवराव माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील ,माजी उपसरपंच मारुती गाडे, संग्राम जाधवराव, युवा सेना सचिव विशाल सातव पाटील, वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडवले, रमेश भामगर, आप्पासाहेब कड, संजय शितोळे, काकासाहेब कुंजीर, स्वप्निलजी कुंजीर, काळूराम मेमाणे, नितीन जगताप, रोहिदास गोरे, शैलेश जाधव, विकास गोरे, सचिन सातव पाटील, पप्पू दरेकर, माऊली माथेफोड, प्रवीण कांबळे, संजय देशमुख, पोपट शेलार, अनिल पवार, मच्छिंद्र गदादे व शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व महिला पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट,काँग्रेस व इतर अनेक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला होता खासदार अमोल कोल्हे विजयी झाल्याने आनंद व्यक्त केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!