Sunday, November 3, 2024
Homeताज्या बातम्याडॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचार रॅलीला कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक व सणसवाडी...

डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचार रॅलीला कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक व सणसवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व रामदास दरेकर यांच्याकडून डॉ कोल्हेंना तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे सुंदर व आकर्षक फ्रेम भेट

सणसवाडी (ता.शिरूर) येथे महविकास आघाडीचे  व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ रॅलीला कोरेगाव भिमा, वढु बुद्रुक व सणसवाडी येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  सणसवाडी येथील मुख्य चौकातून तुताऱ्यांच्या गजरात मोठी रॅली निघाली यावेळी फटाकड्यांची आतषबाजी करण्यात येऊन महिला भगिनींनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार.. आमदार अशोक पवार व डॉ अमोल कोल्हे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. डॉ कोल्हेंनी  ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यावर आबालवृद्धांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.

            यावेळी कोरेगाव भीमा येथील रॅली नंतर डॉ अमोल कोल्हे यांनी श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथील श्री छञपती संभाजी महाराज समाधीस्थळी नतमस्तक झाले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवावर्ग तसेच नागरिक व विशेषतः महिला भगिनी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

सणसवाडी येथे माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी रामदास दरेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांना तुतारी बजावणारा माणूस हे रेखीव असे सुंदर छायाचित्र भेट दिले.डॉ कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी याबाबत कौतुक केले. सुंदर छायाचित्र सर्वांचे लक्ष वेधत होतें.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!