Wednesday, October 30, 2024
Homeताज्या बातम्याडिंग्रजवाडी येथे विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत गुलाब पुष्प व खाऊ देत अभूतपूर्व स्वागत

डिंग्रजवाडी येथे विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत गुलाब पुष्प व खाऊ देत अभूतपूर्व स्वागत

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शाळा प्रवेशोत्सव आणि शाळापूर्व मेळावा क्र.२ हे दोन्ही उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळा सजावट,ट्रॅक्टर ट्रॉली सजवून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत औक्षण करण्यात आले,तसेच पहिलीत दाखल विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि गुलाबपुष्प देण्यात येऊन उत्साहाच्या वातावरणात अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले.

या प्रवेशोस्तव दिनानिमित्त शाळा पूर्व मेळावा क्र.2चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या स्वागताचे बालकांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य व बाललीला पाहून पालक व ग्रामस्थ आनंदित झाले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास गव्हाणे, शिक्षण तज्ञ विशाल गव्हाणे, पायल गव्हाणे, वैशाली गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गव्हाणे तसेच सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे यांनी भेट दिली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!