Tuesday, October 8, 2024
Homeताज्या बातम्याडिंग्रजवाडी येथे विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार... खरेदीसाठी आले पालक,ग्रामस्थ

डिंग्रजवाडी येथे विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार… खरेदीसाठी आले पालक,ग्रामस्थ

आमदार अशोक पवार यांची शाळेला भेट..उपक्रमाचे कौतुक

कोरेगाव भिमा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावे तसेच खरेदी- विक्री,नफा तोटा याचा अनुभव प्रात्यक्षिकातुन मिळावा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमासाठी गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. पालकांनी ग्रामस्थांनी शालेय बाजारातून चांगल्या प्रकारे खरेदी केली. 

  या उपक्रमाला आमदार अशोक पवार यांनी भेट देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान देत त्यांना समृद्ध करणारा उपक्रम स्तुत्य असून असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

  कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच यशवंत गव्हाणे, शालेय समिती अध्यक्ष  विकास शामराव  गव्हाणे, शिक्षणतज्ञ  विशाल गव्हाणे, माहिती अधिकार कार्यकर्ते खंडू गव्हाणे,माजी उपसरपंच  बाप्पूसाहेब गव्हाणे  यांच्या हस्ते करण्यात आले.

     शिरूर हवेलीचे आमदार  अशोक पवार यांनी बाल आनंद मेळाव्याला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अतिशय स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात  नक्कीच भर पडेल असे सांगितले. 

 यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे,माजी चेअरमन संभाजी गव्हाणे, हनुमान पत संस्थेचे संचालक दत्तात्रय गव्हाणे, जय गव्हाणे, पंडित ढेरंगे, पुणे जिल्हा केसरी पैलवान बालाजी गव्हाणे,प्रवीण गव्हाणे, पोपट ढेरंगे, सतीश गव्हाणे, ,सागर गव्हाणे ,दत्तात्रय कोतवाल सुधीर गव्हाणे, बालाजी गव्हाणे , संतोष गव्हाणे, विजय गव्हाणे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,समस्त ग्रामस्थ उपस्थित होते हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी तर उपशिक्षक महेश गायकवाड यांनी आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!