Tuesday, September 10, 2024
Homeक्राइमचोरीसाठी आलेल्या चोरट्याने पळून जाताना घरमालकाचा फोडला डोळा...

चोरीसाठी आलेल्या चोरट्याने पळून जाताना घरमालकाचा फोडला डोळा…

चोरी करण्याच्या उद्देशानं चोराने कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश करताना घरामालक आणि भाडेकरुला जाग आली घरमालक जागा झाल्याचे पाहून  पळून जाणाऱ्या चोरट्यानं हातातली लोखंडी वस्तू घरमालकाच्या आवाजाच्या दिशेने भिरकावल्याने  डोळ्यावर लागली त्यामुळे मालकाचा डोळा जखमी झाला.

हा धक्कादायक प्रकार अक्कलकोट रोडवरील यशराज नगरात पहाटे अडीचच्या सुमारास घडला. नागनाथ दत्तात्रय महाजन (वय- ७३) असे जखमीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी अक्कलरोड येथील यशराज नगरात राहतात. वाढत्या उकाड्यामुळे ते व त्यांचे भाडेकरु अंगणात झोपलेले होते. 

पहाटे अडीचच्या सुमारास एक अनोळखी २५ ते ३० वयोगटातील तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात आला. आवाजानं अंगणात झोपलेले फिर्यादी आणि भाडेकरुंना जाग आली. घराच्या दरवाजाची तोडफोड करुन आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. जागी झालेल्या फिर्यादीने आवाज दिल्याने चोरट्यानं घाबरुन पळ काढताना फिर्यादीच्या दिशेने हातातील लोखंडी वस्तू भिरकावून मारली. यात फिर्यादीचा डोळा निकामी होऊन जखम झाली. एव्हाना चोरटा पसार झाला. सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला असून तपास सपोनि सोळुंके करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!