Tuesday, July 16, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?गळ्यात कांद्याची माळ, हातात दुधाची बाटली घेऊन शेतकरी थेट पोहोचला मतदान करण्यासाठी

गळ्यात कांद्याची माळ, हातात दुधाची बाटली घेऊन शेतकरी थेट पोहोचला मतदान करण्यासाठी

एका मतदाराने अनोख्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला आहे. या शेतकऱ्याने गळ्यात कांद्याची माळ आणि हातात दुधाची बाटली घेऊन मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे.यामुळे हा मतदार शेतकरी चांगलाच चर्चेत आला आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असून महराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. उस्थळ दुमाला, ता. नेवासा इथं एका मतदाराने अनोख्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला आहे.

या शेतकऱ्याने हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे.कांद्याच्या आणि दुधाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत असून अहमदनगर जिल्ह्यातील उस्थळ दुमाला येथील शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी त्रिंबक भदगले यांची सर्वत्र चर्चा होत आहे. भदगले यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून आणि हातात दुधाची बाटली घेऊन मतदान केले. सध्या कांद्याला आणि दुधाला दर नसल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकरी त्रिंबक भदगले यांनी निषेध नोंदवण्यासाठी हातात दुधाची बॉटल आणि गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केल्याचे पाहायला मिळालं.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!