Thursday, September 12, 2024
Homeक्राइमखळबळजनक!बायको व सासरच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

खळबळजनक!बायको व सासरच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

नाशिकच्या आडगाव परिसरात पत्नी, सासू आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाशिक आडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पत्नी आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा प्रकार आडगावच्या नगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. 

तुषार अंतारपूरकर असे आत्महत्या केलेल्या मृताचे नाव आहे. तुषारने आत्महत्येपूर्वी चार पानी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्याने मी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा म्हटलं आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

मुलाच्या वडिलांचा आरोप. – तुषारचे वडील केशव अंतापूरकर यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत वडिलांनी म्हटलं की, तुषारचं २००८ साली शीतलसोबत विवाह झाला. पत्नी लग्नानंतर दोन महिन्यातच माहेरी निघून गेली. गेल्या १५ वर्षांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी आहे. 

नवरा मुलगा तिला घरी येण्यासाठी वारंवार विनंती करत होता. सासरे वसंत चव्हाण, सासू शालक यांनी संगनमत करत तुषारचे शारीरिक, मानसिक छळ करायचे. तुषार या छळाला कंटाळला होता. आता आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे म्हणत आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी आत्महत्या केल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!