Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमनराधम सावत्र बापाने साडे चार वर्षांच्या मुलीला उलटे टांगून चटके देत गुप्तांगावर...

नराधम सावत्र बापाने साडे चार वर्षांच्या मुलीला उलटे टांगून चटके देत गुप्तांगावर मारहाण करत केला अत्याचार

पोलिसांनी सावत्र बापाला ठोकल्या बेड्या

साडे चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मानसिक व शारीरिक छळ तसेच क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी नराधम सावत्र बापाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार ५ जून ते १४ जून २०२४ या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथे घडला आहे. हा धक्कादायक प्रकार मुलीने तिच्या शिक्षकांना सांगितल्यावर उघडकीस आला आहे.

याबाबत मुलीच्या ३१ वर्षीय महिला शिक्षकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुनिल राजू चौहान (वय-२२ रा. रामंदिराजवळ, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याच्यावर  गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी सातत्याने रडायची. तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसत होते. शिक्षिकेने मुलीला विचारले तिने रडत रडतच सर्व प्रकार सांगितला. आईला देखील मुलीने सांगितले होते. सुरुवातीला आई काहीशी घाबरली होती.  मुलीची आई आणि आरोपी सुनील यांचे प्रेमसंबंध होते. दोघेजण एकत्र राहत होते. आरोपी चौहान आणि बालिकेची आई बांधकाम मजूर आहेत.

   आरोपी सुनिल चौहान हा पिडीत साडेचार वर्षाच्या मुलीचा सावत्र बाप आहे. मुलगी आरोपी सोबत राहते. त्याने मुलीला हाताने व बेलण्याने मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर तिच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला. तसेच चाकू गरम करुन तिच्या पृष्ठभागावर चटके देऊन तिचा छळ केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर मुलीचे दोन्ही पाय बांधून तिला उलटे टांगून तिच्या गुप्तांगावर बेलण्याने मारून क्रूर वागणूक दिली. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला.

हा प्रकार मुलीच्या महिला शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीकडे चौकशी केली. मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार फिर्यादी यांना सांगितला. त्यानंतर महिला शिक्षिकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी सावत्र बापाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नराधम बापाला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!