Monday, June 17, 2024
Homeइतरकोरेगाव भीमा स्वरसाधना युवा भजनी मंडळाचा खेड तालुक्यातील कडधे येथील भजन स्पर्धेत...

कोरेगाव भीमा स्वरसाधना युवा भजनी मंडळाचा खेड तालुक्यातील कडधे येथील भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक

स्वरसाधना भजनी मंडळावर अभिनंदनाचा वर्षा

कोरेगाव भीमा- कोरेगाव भीमा (ता.शिरूर)

स्वरसाधना युवा भजनी मंडळाने खेड तालुक्यातील कडधे येथील भजन स्पर्धेमध्ये एकूण ३० संघामध्ये प्रथम क्रमांकाचे यश मिळवले असून तरुणाईने भजन स्पर्धेत मिळविलेल्या यशाने आनंद व्यक्त केला असून या विजयाने प्रेरणा मिळाली असल्याची भावना भजनी मंडळाने व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे यात्रा ,जत्रा ,उत्सव यावर बंदी घालण्यात आली होती . कडधे गावचे आराध्य दैवत श्री खंडेरायाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रींच्या मंदिरात संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगाव भीमा येथील स्वर साधना युवा भजनी मंडळाचे सहभाग घेतला यामध्ये पेटी वादक व गायक शहाजी ढेरंगे, सह गायक भानुदास सुतार,प्रणव यशवंत,बासुरी वादक श्रीकांत गव्हाणे ,तबला वादक ओंकार यशवंत,पखवाज ऋषी शिपलकर यांनी सुरतालबद्ध भजन केले . सदर स्पर्धेस आळंदी व परिसरातील नामवंत व जाणकार भजनी मंडळे उपस्थित होते.

याबाबत बोलताना आम्ही सर्वांनी उत्तम सादरी करण करण्याचा प्रयत्न केला असून भजन स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालो होतो. आम्हाला प्रथम क्रमांक मिळाल्याने अत्यंत आनंद होत असून आम्ही यापुढेही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहोत. . -भानुदास सुतार ,गायक स्वरसाधना भजनी मंडळ

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!