Tuesday, July 16, 2024
Homeइतरकोरेगाव भीमा येथे एसटी बसेसना तातडीने थांबा मंजुर करा-कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची मागणी

कोरेगाव भीमा येथे एसटी बसेसना तातडीने थांबा मंजुर करा-कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची मागणी

कोरेगाव भीमा ( ता. शिरूर) नगर महामार्गावर पुण्याहून अहमदनगरकडे जाताना शिरुर तालुक्यातील पहीले व औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे गाव असलेल्या कोरेगाव भीमा येथे तसेच हमरस्त्यालगत राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या मालकीची जागा असूनही एसटीच्या बसेसना थांबा मंजुर नाही. त्यामुळे बाहेरगावचे प्रवासी, तसेच कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी यासह सर्वच प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय लक्षात घेवून या ठिकाणी तातडीने थांबा मंजुर करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संदीप ढेरंगे यांनी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडे केली आहे.

    कोरेगाव भीमा येथे सन २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या कागदोपत्री १३ हजार ११६ इतकी असली तरीही प्रत्यक्षात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आलेल्यांची संख्या सुमारे ३० हजाराहून अधिक आहे.

    त्यातच पंचक्रोशीतील १२-१५ गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी आदींची येजा मध्यवर्ती असलेल्या कोरेगावातून सुरु असते. तसेच विदर्भ मराठवाड्यांतील अनेक कुटूंबे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या परिसरात स्थलांतरीत झालेली आहेत. या सर्वांना एसटी बसमध्ये चढणे अथवा उतरण्यासाठी १० किलोमीटर अंतरावर वाघोली अथवा शिक्रापूरला जावे लागते. त्यामुळे ज्यादा तिकीटदरासह अधिकच्या प्रवासाचा भुर्दंडही प्रवाशांना सोसावा लागतो. यात ज्येष्ठ नागरीक व रु्गणांची मोठी कुचंबणा होते.    

       या सर्व बाबींचा विचार करुन बाहेरगावचे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी यासह सर्वच प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय थांबवून त्यांना दिलासा देण्यांसाठी या ठिकाणी तातडीने थांबा मंजुर करावा, अशी लेखी मागणी कोरेगाव भीमा ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या वतीने सरपंच संदीप ढेरंगे यांनी राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, तसेच एसटीच्या शिवाजीनगर, स्वारगेट तसेच शिरूर आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.

एसटी प्रवाशांना सध्या प्रवासासाठी ज्यादा तिकीटदरासह करावा लागणारा अधिकच्या प्रवासाचा भुर्दंड व गैरसोय टाळण्यासाठी कोरेगाव भीमा येथे नगर हमरस्त्यालगत असलेल्या एसटी महामंडळाच्या गट क्र. ४७२ मधील सुमारे ०.६४ आर जागेत स्थानक अथवा बसथांबा तातडीने  उभारुन महामंडळाने प्रवाशांना दिलासा द्यावा. –सरपंच संदीप ढेरंगे, कोरेगाव भीमा.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!