Tuesday, July 16, 2024
Homeक्राइम कोरेगाव भिमा येथे लग्नावरून परतणाऱ्या शिक्षिकेला दुचाकीवरून पाडत चोरट्यांनी हिसकावले ९...

 कोरेगाव भिमा येथे लग्नावरून परतणाऱ्या शिक्षिकेला दुचाकीवरून पाडत चोरट्यांनी हिसकावले ९ तोळे सोन्याचे गंठण.. 

पती, मुलासह ॲक्टीवा गाडीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला खाली पडल्याने शिक्षिकेच्या  तोंडाला, नाकाला, कपाळयावर, पायाला, किरकोळ व गंभीर दुखापत 

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे विद्यार्थ्याच्या लग्नावरून घरी परत जाणाऱ्या ॲक्टिवा गाडीवरील पती,मुलगा व शिक्षिका अक्टिवा गाडीवरून परत जात ऑक्ट एच पि पेट्रोल पंपाजवळ  पाठीमागून आलेल्या  मोटार सायकलवरील दोघांनी ॲक्टिवावर मागे बसलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचा मिनी गंठण १ तोळे वजनाचा व गळयातील सोन्याचा मोठा गंठण ८ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने गळ्याला हिसका मारून चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. 

स्वराज्य राष्ट्र
साभार इंटरनेट प्रातिनिधिक फोटो

  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अरुणा दिलीप पवार ( वय ३९) रा.तळेगाव ढमढेरे यांनी फिर्याद दाखल केली असून मिळलेल्याहीतीनुसर अरुणा पवार मॅडम या शिक्षिका त्यांचे पती दिलीप पवार व मुलगा यांच्यासोबत  विद्यार्थ्याच्या लग्नावरून ॲक्टिवा मोटार सायकल नं एमएच १२ टी. एफ. ६९१३ वरून घरी परतताना   रात्री ८:०० वा.चे सुमारास  कोरेगावभिमा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ आलो असता.  पाठीमागून  मोटार सायकलवर आलेल्या दोघांनी मोटार सायकलजवळ आले सायकलवर पुढे बसलेल्या  टी शर्ट घेतलेल्या इसमाने व त्याच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने शिक्षिकेच्या  गळ्यातील सोन्याचा मिनी गंठण १ तोळे वजनाचा व गळयातील सोन्याचा मोठा गंठण ८ तोळे वजनाचा पेंन्डलसह असलेला  असा एकूण किंमत २,०६,०००/- चोरून नेला हिसका मारल्याने  मोटार सायकलवरून रोडवर पडल्याने शिक्षिकेच्या  तोंडाला, नाकाला, कपाळयावर, पायाला, किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे.

संबधित प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.सध्या लग्न सराईचे दिवस असून महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने घालतात.चोर आपले टार्गेट शोधतात व संधी मिळाली की चोरी करतात.सध्या बाजारात आर्टिफिशियल दागिने, एक ग्रॅम सोन्याचे दागिने उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर व्हायला हवा.स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या मार्गात या चोरणावर व्यापक व परिणामकारक कारवाई व्हायला हवी. 

      गाडीवर जाणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिण्यांसाठी त्यांना चालत्या दुचाकीवरून खाली पाडणे व दागिने चोरणे ही अमानवीय व क्रुरतेचा कळस असणारी प्रवृत्ती आहे.इतरांच्या जिविताचे काय ? या चोरांना पोलीस तातडीने बेड्या ठोकण्यात शिक्रापूर पोलिसांना कितपत यश येते की नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!