Sunday, September 15, 2024
Homeक्राइमकोरेगाव भिमा येथे भामट्याने वायरमन असल्याचे भासवत  ७० वर्षांच्या आजीशी खोटे बोलून...

कोरेगाव भिमा येथे भामट्याने वायरमन असल्याचे भासवत  ७० वर्षांच्या आजीशी खोटे बोलून चोरले मंगळसूत्र

डेअरीचे वीजबिल थकले असून ते भरण्यासाठी दिवसाढवळ्या लांबवले सोन्याचे मंगळसूत्र

कोरेगाव भिमा  (ता. शिरूर) (दिनांक ८ मे )येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तुमच्या दूध डेअरी चे वीज बिल थकले असून वीजबिल भरायचा आज शेवटचा दिवस आहे. असे भासवून ७० वर्षांच्या आजीचे एक तोळा वजनाचे मंगळसूत्र चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे डिंग्रजवाडी येथील सखुबाई रघुनाथ गव्हाणे ( वय ७० वर्षे) यांनी फिर्यादी दिली असून त्यानुसार मिळालेली माहिती अशी की सखुबाई गव्हाणे यांच्या पाठीमध्ये चमक भरल्याने मुलाच्या गाडीवर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेलेल्या असताना हॉस्पिटल मध्ये नंबर असल्याने काही कामानिमित्त मुलगा थोडा वेळ बाहेर गेला होता.

   यावेळी मोटर सायकलवर आलेल्या एका अज्ञात इसमाने वायरमेन असल्याचे भासवत सखुबाई  गव्हाणे यांना दुचाकी वर बसवून नेत वढू बुद्रुक रस्त्याच्या कडेला गाडी थांबवत तुमच्या दूध डेअरीचे लाईट बिल थकले असून विज बिल भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. असे म्हणत लाईट बिल भरण्यासाठी तुमचं मंगळसूत्र द्या असे सांगून एक तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन 

 गव्हाणे यांना तिथेच सोडून पळून गेला. यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गव्हाणे यांनी मुलगा सुनील गव्हाणे झालेल्या प्रकार सांगितला.

  सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!