Wednesday, September 11, 2024
Homeइतरकोरेगाव भिमा येथे बिर्याणीच्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला तर दुसऱ्याला लोखंडी रॉडने...

कोरेगाव भिमा येथे बिर्याणीच्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला तर दुसऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे गाझी बिर्याणी दुकानातून पार्सल नेण्यासाठी आलेल्या दोन मित्रांना बिर्याणी संपली असल्याचे सांगणाऱ्या दुकानदाराला  थोडी तरी बिर्याणी द्या अशी मागणी करत असताना झालेल्या वादातून शेजारी बसलेल्या एकाने वाद घालत मित्राला घेऊन येत कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

   शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अतुल संजय मते, (वय २४ वर्षे,   कोरेगाव भिमा आदित्य पार्क) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार तक्रारदार शुभम रमेश उत्तेकर हा रा.नक्षत्र सोसायटी, कोरेगाव भिमा हे सोमवार २५ मार्च धुलीवंदनाच्या दिवशी रात्री १०.३० वाजणेचे सुमारास अतुल मते व शुभम उत्तेकर हे दोघे मित्र  बिर्याणी पार्सल घेण्याकरीता गाझी केटरर्स, कोरेगाव भिमा या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे बिर्याणी संपल्याचे हॉटेलमालकाने  सांगितले असता त्याला आग्रह करून थोडीतरी , बिर्याणी पार्सल द्या  परंतु हॉटेल मालक तक्रारदार यांच्याशी हुज्जत घालुन बिर्याणी खतम होगई है, नही मिलेगी” असे म्हणाला. त्याचवेळी तेथे शेजारी असणारा एक इसम आला  त्याने ‘मी राम कांबळे आहे असे सांगत  तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का?” असे म्हणुन राम कांबळे याने अतुल मते व मित्र शुभम उत्तेकर यांना शिवीगाळ करू लागला. 

त्यावेळी दोघांनीही त्यास समजावनु सांगत  “तु आमच्यामध्ये कशाला पडतो. तु इथुन निघुन जा” असे सांगितल्यावर , राम कांबळे हा तेथुन निघुन गेला व लगेच हातामध्ये एक लोखंडी कोयता घेवून आला. त्याचे सोबत त्याचा भाऊ (नाव अज्ञात)  त्याचे हातामध्ये लोखंडी रॉड होता. त्यानंतर राम कांबळे याने त्याच्या हातामधील लोखंडी कोयता तक्रारदार अतुल मते याच्या डावे हातावर व पाठीवर मारून गंभीर दुखापत केल्याने डावे हातातुन व पाठीतुन रक्त यायला लागले, त्याचवेळी राम कांबळे याच्या भावाने  शुभम उत्तेकर याच्या पाठीवर, उजव्या पायाच्या मांडीवर व दोन्ही पायांवर लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. तक्रारदार व त्याचा मित्र कसेबसे त्यांच्या तावडीतुन निसटुन पळुन गेलो व त्यांनवर आय मॅक्स हॉस्पीटल वाघोली येथे औषधोपचार घेवुन  शिकापुर पोलीस स्टेशन येथे तकार दिली. याबाबत पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

ग्रामीण भागाचा बिहार होतो काय?? – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोयत्याचे लोण पसरते की काय ? थोड्या वादावरून जर कोयत्याने मारहाण होत असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करायला हवी जर याबाबतीत काहीच होत नाही ? असा चुकीचा समज गुन्हेगारांमध्ये पसरला तर ग्रामीण भागाचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!