Saturday, November 9, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा येथील जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामाविषयी व दर्जाविषयी नागरिकांच्या तक्रारीवर...

कोरेगाव भिमा येथील जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामाविषयी व दर्जाविषयी नागरिकांच्या तक्रारीवर अधिकारी निरुत्तर

जलजिवन मिशनच्या पाण्याची टाकी बनवण्यासाठी नाही जागा ,रस्त्यांचे नुकसान करत कोट्यावधी रुपयांचे नुसते टाकण्यात येतात पाईप

कोरेगाव भीमा, ता. २९ :  कोरेगाव भीमा ग्रामपंचायत कार्यालयात जलजीवन मिशन पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांसमवेत ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या आजवर झालेल्या तसेच पुढील कामाबाबतही चर्चा झाली. मात्र या चर्चेत ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी समर्पक उत्तर देवू न शकल्याने बैठकीत अधिकाऱ्यांबाबत नाराजीचे सुर उमटले.  

     कोरेगाव भीमा व वाडा ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे २२ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये खर्चाची नवी पाणी योजना उभारली जात आहे. प्रति माणशी ५५ लिटर प्रमाणे आगामी ३० वर्षाचे नियोजन धरुन या योजनेतील कामे सुरु आहेत. या बैठकीस सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे तसेच वाडा वाडागावचे माजी सरपंच वसंत गिलबिले, वसंत भोकटे, उपसरपंच संपत माळी, तसेच पाणी योजनेचे कंत्राटदार गौरव पाथरकर व सल्लागार शैलेश वेताळ त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सुरेश भांडवलकर, अशोक फडतरे, देवदत्त गव्हाणे, पांडा बगाटे, नितीन कांबळे हेही उपस्थित होते. 

       यावेळी उपस्थित असलेले दत्तात्रय फडतरे, संदीप फडतरे, बापू फडतरे, सचिन फडतरे, सुनिल गव्हाणे, विजय शिंदे, राजेंद्र शिंदे या ग्रामस्थांनीही या योजनेच्या कामातील दोषांबाबत प्रश्न उपस्थित केले.       

दरम्यान या योजनेचे उपअभियंता श्रीकांत राऊत यांना आजच्या बैठकीला बोलावूनही ते अनुपस्थित राहील्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.  बैठकीत झालेल्या चर्चेत एक एकर जागेअभावी फिल्टरेशन प्लँटचे मोठे काम थांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने या कामाला गती देण्याची ग्वाही सरपंच संदीप ढेरंगे व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी दिली. 

       दरम्यान सध्या नव्या योजनेतील अंतर्गत पाईपलाईनचे बहुतांश काम पुर्ण झाले असल्याने ही पाईपलाईन सध्याच्या चालु योजनेला जोडल्यास या पाईलाईनची चाचणीही होईल तसेच ग्रामस्थांचा सध्याचा पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटू शकेल, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र त्यास अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने शुद्ध पाण्यासाठी कोरेगाव ग्रामस्थांना पुढील वर्षापर्यत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्टये :  योजनेचा एकुण खर्च : २२ कोटी ७६ लाख ४ हजार रुपयेआगामी ३० वर्षाचे नियोजन धरुन ७५ हजार १९६ लोकसंख्येच्या हिशेबाने दरडोई ५५ लिटरच्या हिशेबाने योजनेचे काम सुरु.एकुण जलवितरण पाईपलाईन अंतर : ३४. ६ कि.मी.(सध्या २३. ६ कि.मी.चे काम पुर्ण) पाण्याचा स्रोत –  भीमा नदीत ८ मीटर खोल व ४ मीटर रुंद जॅकवेल.

कंत्राटदाराने सांगितलेल्या अडचणी – जलशुद्धीकरण WTP योजनेसाठी जागेची अडचण येत असून तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात यावी.हमरस्ता क्रॉसिंग करण्यासाठी तसेच हमरस्ता लगत पाईपलाईनची अडचण येत आहे. गावात अंतर्गत पाईपलाईन रस्ताच्या मधोमध टाकावी लागेल.जॅकवेलसाठी तात्पुरता बंधारा टाकण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

 ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार अडचणी –  सध्याचा रस्ता ३.७५ मीटर हून अधिक वाढल्यास  दुरुस्ती कशी करणार ? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. तर रस्ता फोडल्यानंतर पुन्हा दर्जेदार दुरुस्ती नाही. काँक्रीट रस्ता कटरने कट करण्याऐवजी JCB ने रस्ता फोडल्याने नुकसान मोठे, जुजबी दुरुस्ती करण्यात येत आहे त्यामुळे जल जीवन मिशन योजनेचे पाईप टाकताना सिमेंट काँक्रिट रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून जेसीबी च्या साहाय्याने खोदल्याने रस्त्याला तडे जातात व रस्त्याचे नुकसान होत आहे.

    रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदाई करून पाईप टाकण्यात यावे. जर रस्त्याच्या मधोमध शुद्ध पाणी येणार  व रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी पुरवठा करणारी पाईप टाकल्याने पूर्णपणे रस्त्याचे नुकसान होऊन  बाजूने खोदून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे पूर्णपणे नुकसान होईल.

३० वर्षाचे नियोजन करताना व पाईपलाईन टाकताना वाढणाऱ्या रस्ताचे नियोजन नाही.जागा निश्चित नसतानाही चुकीच्या पध्दतीने पाईपलाईन टाकली.रस्त्याच्या एका बाजुला घरे व दुसऱ्या बाजुला पाईपलाईन अशी स्थिती विदारक स्थिती.ज्याला तांत्रिक माहिती नाही अशा माणसाकडे  तांत्रिक पाहणीचे काम सोपण्यात आले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!