कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ग्राम पंचायत कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरेगाव भिमा ग्राम पंचायत कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, कोमल खलसे ,ग्राम विकास अधिकारी रतन दवणे व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.