मृत तरुणांमध्ये शिरूर तालुक्यातील सणसवाडीतील तिघेजण तर पाबळ येथील तरुण जखमी
कोरेगाव भिमा – केसनंद (ता.हवेली) येथे दिनांक २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. १० मि. जोगेश्वरी माता मंदिराच्या समोरील वळणाला कंटेनर व इको गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील ,३५ व ३६ वयोगटातील ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण जखमी झाला आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे बालचंद्र शिवाजी पांचाळ, वय ३६ वर्षे, सध्या रा.वाघोली, मूळ पत्ता, मुपो कौठाळा ता. देवणी,लातूर यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार २८ एप्रिल रोजी रोजी सायंकाळी ०७.१० वा. चे सुमारास केसनंद येथील जोगेश्वरी मंदिरासमोर, केसनंद कडून लोणीकंद कडे जाणाऱ्या रोडवर, ट्रक क्रमांक एन.एल.-०१- ए.एफ.-०७५३ वरील चालक मच्छिंद्र तुकाराम जाधव रा. गावठाण, काराठी ता. बारामती जि पुणे याने त्याचे ताब्यातील ट्रक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करूण बेदकारपणे, अविचाराने, हयगयीने, भरधाव वेगाने चालवून मारूती सुझुकी कंपनीची इको गाडी क्रमांक एम.एच.१४-जी.एच.४०२७ या गाडीस समोरासमोर धडक दिली.
या अपघातात हेमंत लखमन दलाई, (वय ३० वर्षे) रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर जि पुणे यास गंभीर दुखापत करून गणेश सुखलाल जाधव, (वय ३५ वर्षे ) रा. एल.एन.टी. फाटा सणसवाडी, ता शिरूर जि पुणे, विनोद तुकाराम भोजणे, (वय ३६ वर्षे )रा. सदर, विठ्ठल प्रकाश जोगदंड, (वय ३६ वर्षे) रा. सदर यांना गंभीर दुखातप करून त्यांचे मृत्युस कारणीभूत झाला म्हणून ट्रक क्रमांक एन.एल.०१-ए.एफ.०७५३ वरील चालक मच्छिंद्र तुकाराम जाधव रा. गावठाण, काराठी ता. बारामती जि पुणे याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात इतका भीषण व गंभीर होता की जखमींना गाडीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना एक तास लागला.यावेळी पोलीस निरीक्षक ढाकणे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक केदार, पोलीस उपनिरीक्षक कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ,विशाल गायकवाड, ढवळे, व वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांनी मदत केली.लोणीकंद पोलिसांकडून सदर घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.