Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमकूलरची हवा बेतली जीवावर..१४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू..

कूलरची हवा बेतली जीवावर..१४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू..

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असून कुलराची हवा एका १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या जिवावर बेतली असून या दुर्दैवी घटनेमध्ये कूलरमुळे एका १४ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अन् क्षणात सर्व संपले –  हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात सुकळी खुर्द या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. उन्हाळा सुरू असल्याने व  घरात जास्त गरम होत असल्यानं गणेश खिल्लारी ( वय १४) कुलर लावण्यासाठी गेला यावेळी कुलरमध्ये पाणी घातल्यानंतर गणेशला वीजेचा जोरदार धक्का बसला. शॉक लागताच गणेश जमिनीवर कोसळला. त्याचा आवाज ऐकून घरातील लोक तिथे आले. त्यांनी वीजपुरवठा बंद केला आणि गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुकळी गावात घडलेल्या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!