Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याकिसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी असून लागेल ती मदत...

किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी असून लागेल ती मदत करणार -खासदार उदयनराजे भोसले

सातारा – वाई तालुक्यातील खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी आमदार मकरंद पाटलांना लागेल ती मदत करायला तयार असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.





येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात उदयनराजे भोसले यांनी, सहकारी साखर कारखान्यांना काँग्रेसच्या सरकारच्या काळात आयकर भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. हा आयकर माफ करण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. याचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढी साठी भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. कृषी शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करण्याची संकल्पना मांडली. त्याबाबतची सरकारच्या माध्यमातून निर्णय होईल.

मकरंद पाटील म्हणाले, खंडाळा आणि वाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून आपण महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. खंडाळा कारखाना आणि भुईंज येथील किसन वीर दोन्ही कारखाने अडचणीत आहेत. दोन्ही तालुक्यातील ८५००० कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून आहेत. दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे या दोन्ही कारखान्यांची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतली आहे असे प्रतिपादन मकरंद पाटील यांनी केले.

याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, जिल्हा बँकेत संचालक राजेंद्र राजपुरे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लवंगारे, संजय गायकवाड शामराव गाढवे मदन आप्पा भोसले माजी कृषी सभापती मनोज पवार नितीन भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!