Tuesday, October 8, 2024
Homeकृषिऐका हो ऐका ! कोरेगाव भिमा येथील जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर मिळेल का? डॉक्टर...

ऐका हो ऐका ! कोरेगाव भिमा येथील जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर मिळेल का? डॉक्टर .. एका आठवड्यात दोन जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू… 

लंपि आजाराने दिड वर्षाच्या बैलाचा व एका वासराचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, प्राण्यांच्या डॉक्टर टीम कडून सोमवारपासून तातडीने व्यापक लसीकरण करण्यात येणार

कोरेगाव  भिमा (ता.शिरूर) येथील जनावरांच्या दवाखान्यात मागील काही महिन्यांपासून जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नाहीत, लम्पी वरील लस मागील दोन महिन्यांपासून उपलब्ध आहेत पण त्या देण्यासाठी डॉकटर नाहीत, लम्पि आजाराने एक आठवड्यापूर्वी एका वासाराचा तर आज दीड वर्षाच्या बैलाचा मृत्यू झाला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सरकार दरबारी ऐका हो ऐका..कोरेगाव भिमा येथील जनावरांच्या दवाखान्याला डॉक्टर मिळेल का? डॉक्टर अशी शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकून तातडीने डॉक्टर उपलब्ध करून देतील का ?? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

   कोरेगाव भिमा येथील बाळासाहेब बबन सुपेकर यांच्या दिड वर्षाच्या गावरान बैलाचे लम्पी रोगाच्या साथीने मृत्यू झाला असून मागील आठवड्यात एका वासराचा मृत्यू झाला होता.यामुळे सुपेकर कुटुंबियांना एका आठवड्यात गोठ्यातील दोन जनावरांना मुकावे लागले असून गोठ्याच्या दावनितील दोन आवडत्या प्राण्यांच्या  मृत्यूने सुपेकर कुटुंबीयांचे डोळे पाणावले असून लम्पी आजाराने जनावरे दगावत असल्याने कोरेगाव भिमा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लम्पी आजाराच्या लसी उपलब्ध पण डॉक्टर नाहीत – कोरेगाव भिमा येथील ग्राम पंचायतीच्या इमारतीत जनावरांचा दवाखाना असून येथील दवाखान्यात मागील काही महिन्यांपासून येथे डॉक्टर नसल्याने सरकार कडून उपलब्ध झालेल्या लम्पि लसी देण्यासाठी उशीर होत आहे.यामुळे आजारावरील लस आहे पण डॉक्टर नाही अशी दयनीय अवस्था शेतकरी व जनावरांची  झाली असून 

   यावेळी सरपंच संदिप ढेरंगे, सहाय्यक पशू संवर्धन आयुक्त डॉ.नितीन पवार ॲड.ऋषिकेश सरडे, शेतकरी बाळासाहेब सुपेकर, श्रीपाद सुपेकर व शेतकरी उपस्थित होते.

कोरेगाव भिमा येथे तातडीने जनावरांचे डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. तातडीने कोरेगाव भिमा येथील जनावरांचे लसीकरण करण्यात येऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.- सरपंच संदिप ढेरंगे, ग्राम पंचायत कोरेगाव भिमा 

कोरेगाव भिमा येथील मृत्यु झालेल्या बैलाची पाहणी केली असून त्याचा पंचनामा केला आहे. आणखी दोन ठिकाणी जनावरांवर उपचार सुरू आहेत. कोर्टात स्टे असल्याने डॉक्टरांची ऑर्डर निघूनही कोर्टाच्या स्थगितीमुळे डॉक्टर हजर झाले नाहीत. या आठवड्यात तातडीने कायमस्वरूपी  डॉकटर उपलब्ध होतील अशी आशा असून शेतकरी बांधवांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे तसेच सोमवार पासून एक टीम कोरेगाव भिमा येथील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी येणार आहे. – डॉ नितीन पवार , सहाय्यक आयुक्त पशू संवर्धन, शिरूर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!