सणसवाडी (ता.शिरूर) पांढराशुभ्र वारकरी पोशाख, डोक्यावर फेटा किंवा टोपी,कापली गोपीचंद टिळा, खांद्यावर डोलणारी भागवत धर्माची पताका, मुखी हरिनाम, नाचत,गात ,ज्ञानोबा माऊली तुकाराम अखंड नामजप ,महिला भगिनिंच्या डोक्यावर तुळस,, गळ्यात वीणा, टाळ, मृदंग, विणा यांच्या गजरात हरी नामाचा गजर करत ज्ञानोबा तुकोबा जयघोष करत उत्साहात उद्योगनगरी सणसवाडी येथील श्री भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे श्रीक्षेत्र देहू कडे प्रस्थान मोठ्या भक्तिभावाने झाले.
आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी वारीमध्ये सहभागी होत पायी चालत देहूच्या दिशेने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे.
यावेळी गावातील स्थानिक प्रतिनिधी, युवा, महिला, बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.