Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याआळंदीत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि...

आळंदीत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

पुणे – पुंडलिका वरदा श्री हरी विठ्ठल , माऊली ज्ञानेश्वर महाराज की… अशा जय घोष सुरू होता, अखंड टाळ – मृदुंगाचा सुमधुर निनाद, डौलाने डोलणारी भगवी पताका, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

विठुरायाच्या दर्शनाची आस लागली असून वारकरी माऊलींच्या सोबत सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला निघाले आहेत माता भगिनींच्या डोक्यावर तुळस आनंदाने डोलत आहे. अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या अलंकापुरी मध्येआज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे.

या पालखी सोहळ्यासाठी अवघी अलंकापुरी सजली आहे. मात्र याच पालखी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागलं आहे.पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद होऊन झटापट झाली. मंदिरातील प्रवेशावरुन सुरू झालेला हा वाद चिघळला व पोलिसांकडून लाठीचार्ज करावा लागला.

आज संत ज्ञानेश्वर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान असल्याने टाळ – मृदुंगाच्या निनादात व ज्ञानेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषात भगवी पताका हाती घेत नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान झाले. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे. अशातच वारकरी अन् पोलीस आमने सामने आले असून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. पालखीचे प्रस्थान होण्याअगोदरच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या पालखी सोहळ्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुरक्षेसाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. हा वाद पोलीस आणि वारकऱ्यांमध्येच झाल्याने पोलिसांचं नियोजन चुकल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे वारकऱ्यांकडून नाराजीचा सूर आहे.आषाढीवारी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आज माऊलींच्या पालखीचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आषाढी वारी सोहळ्याला गालबोट लागल्याचे दिसून आलं आहे. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले आहेत. वारकऱ्यांनीही पोलिसांना न जुमानता मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!