Saturday, November 2, 2024
Homeइतरस्वराज्य राष्ट्र वर्धापन दिनानिमित्त..आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्वराज्य राष्ट्र वर्धापन दिनानिमित्त..आम्ही चालवू हा पुढे वारसा…

स्वराज्य राष्ट्र वर मनःपूर्वक प्रेम करणारे असंख्य वाचक, मार्गदर्शक, हितचिंतक व पाठीराखे यांच्या मार्गदर्शनाने ही वाटचाल सुखकर झाली. मागील तीन वर्षांचा आपला स्नेह वृध्दींगत होत राहिला. कोणताही पक्षपात न करता सामाजिक समस्येला भिडत निर्भिड होऊन बातमी करत राहिल्याने समाजातील अनेक घटकांना स्वराज्य राष्ट्र एक आशेचा किरण दिसू लागल्यावर हक्काने व मोठ्या विश्वासाने आपली समस्या,अडचणी ,यश , शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, कृषी,कला ,क्रीडा अशा विविध क्षेत्रातील उज्वल कामगिरीच्या अथवा यशापयश मांडून समस्यांना व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विश्वासाने स्वराज्य राष्ट्र कडे येत आहेत.

मागील तीन वर्षात सातत्याने प्रिंट काढणे, त्याचे वितरण करणे ऑनलाईन बातम्यांना मोठ्या प्रमाणावर व्ह्युज मिळणे , डेलीहंट (Dailyhunt) सारख्या  भारतातील नामांकित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अधिकृत रित्या येणे ही प्रामाणिक कामाची पावती आहे. आपण आपल्या कामात प्रामाणिकपणा व सातत्य ठेवले तर नक्कीच यश मिळते याचा अनुभव येत आहे.ग्रामीण व निमशहरी भागातून स्वतःचे माध्यम उभे राहत असून त्याचा नावलौकिक होत असताना मनोमन अत्यंत आनंद होत आहे.

     मागील तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले असून काही वाईट,चुकीचे व मनाला दुखावणारे प्रसंग, अनुभव आले तसेच त्यापेक्षा कितीतरी पटीने कौतुक व शाबासकी,खंबीर पाठिंबा देत मार्गदर्शन केले.विविध विषयांवर व्यक्त होत राहणे ,अन्यायाला वाचा फोडणे, कर्तृत्वाचा आदर तर दातृत्व, चांगल्या कामांची कदर करणे हा पिंड जोपासला असून आपले प्रेम व शुभेच्छा अशाच आमच्यावर राहतील काळानुरूप अनेक बदल होणार आहेत त्यांना सामावून घेत पुढे जाणार आहोत.

  निंदकाचे घर असावे शेजारी या उक्ती प्रमाणे अनेकजण त्यांचे निंदा व कुचाळ्या करण्याचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने करत असून त्यात अद्याप त्यांना सातत्याने अपयश मिळत आहे. बिनकामाचा असा वेळ घालवण्यापेक्षा सामाजिक उपक्रमात आग्रहाने सहभागी व्हायला हवे तेही निरपेक्षपणे तसेच स्वतःला कर्तुत्व गाजवता आले नाही तर इतरांच्या कामांवर व यशावर न जळता दिलदारपणा दाखवत प्रोत्साहन देत त्यांच्या कार्याला आपण पुढे नेण्यासाठी मदत करायला हवी अशी सृजनता यायला हवी. 

समाजात अनेक समस्या आहेत सद्सदविवेक पणाला जागृत ठेऊन सहभागी व्हायला हवे तसेच आपण संवेदनशीलता जपत आयुष्याला सुंदर आकार देत समाजाला उपयोगी व दिशादर्शक ठरेल असे काम करण्यास सज्ज राहून समृद्ध पत्रकारितेचा वारसा निःपक्ष पातीपणे पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहोत.आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

   आम्ही चालवू हा पुढे वारसा…

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!