Monday, October 14, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांनी तातडीने सोडवला सणसवाडी येथील प्रियांका नगरचा विजेचा प्रश्न

आमदार अशोक पवार यांनी तातडीने सोडवला सणसवाडी येथील प्रियांका नगरचा विजेचा प्रश्न

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील प्रियांका नगरचा मागील अनेक वर्षापासूनचा विजेचा प्रश्न प्रलंबित होता तेथील तारा व खांबांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.याबाबत आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तातडीने सदर प्रश्न सोडवण्यात आल्याने नागरिकांनी आदर आनंद व्यक्त करत आमदार पवार यांचे आभार मानले.

सणसवाडी येथील प्रियांका नगरमधील १०० कुटुंबे रहिवासी असून त्यांचा  विजेचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तेथे पावसाळ्यात विजेच्या प्रश्नामुळे नागरिकांना विद्यार्थी वयोवृद्ध या नाणे अडचणींना सामोरे जावे लागत होते याबाबत प्रियंका नगरच्या नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांच्याशी संपर्क साधत सदर विजेचा प्रश्न सांगितला असता दरेकर यांनी आमदारा अशोक पवार यांच्याशी संपर्क साधत सदरचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली असता आमदार पवार यांनी एम एस सी बी चे शिक्रापूर उपविभाग  उपकार्यकारीअभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता बाळासाहेब टेंगळे यांना याबाबत तातडीने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सांगितले असता संबंधित प्रश्न अवघ्या आठवड्याभरामध्ये सोडवला यामुळे प्रियांका नगरच्या नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार व पंडित दरेकर यांचे आभार मानले. 

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, सरपंच रुपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष विजयराज दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर व प्रियांका नगर सणसवाडी रहिवासी उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!