Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांचा...

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांचा सत्कार

वडगाव रासाई (ता. शिरूर)  येथे शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा संदीप ढेरंगे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कोरेगाव भिमाचे सरपंच  संदीप ढेरंगे यांची सरपंचपदी दुसऱ्यांदा बहुमताने निवड झाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांच्या हस्ते वडगाव रासाई यांच्या निवास स्थानी करण्यात आला.यावेळी  माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी सरपंच वसंत गिलबिले, संचालक अशोक गव्हाणे, उद्योजक  रवींद्र फडतरे, सुनील गव्हाणे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरेगाव भिमाच्या सर्वानिविन विकासासाठी प्रामाणिक काम आणि कामावर ठाम असा निर्धार असून यासाठी आमदार अशोक पवार यांना मौजे कोरेगांव भिमा  येथील पिंपळेजगताप रोड रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी तसेच कोरेगांव भिमा  येथील ढेरंगेवस्ती फाटा ते डिंग्रजवाडी, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भिमा, न्हावरे पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.   – नवनिर्वाचित सरपंच संदीप ढेरंगे, कोरेगाव भिमा 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!