Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांच्या हस्ते वाघोली येथील बस डेपोचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात...

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते वाघोली येथील बस डेपोचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न

बसडेपोसाठी पावणेतीन कोटींचा निधी

कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली)येथील पिएमपिएल बस डेपोच्या कामासाठी आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांनी २ कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला असून याबाबत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) ने निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
वाघोली येथील बस डेपो हा शिरूर हवेली तालुक्यातील विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, नोकरदार, रुग्ण यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.येथील दररोज ग्रामीण व शहरी भागातील हजारो नागरिक प्रवास करत असतात.ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शिक्षणासाठी पुणे शहरात जाण्यासाठी तसेच रुग्णांना उपचारासाठी, नोकरदारांना कामासाठी पुणे शहर व परिसरात नेहमीच जावे लागत असल्याने त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

  नागरिकांची सुविधा पाहता येथील बस थांब्याची नीत्तांत गरज होती. उन्हा पावसात नागरिकांना थांबून बसची वाट पाहत प्रवास करावा लागत होता.यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी व बस थांबा होणार असल्याने ठरावीक ठिकाणी गाड्या लागणार असून प्रवाश्यांची धावपळ देखील कमी होणार आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होत होती, ही अडचण लक्षात घेऊन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व वाघोली येथील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी पीएमआरडीए कडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार पीएमआरडीएकडून पीएमपीएमएल बस स्थानक सुधारण्यासाठी सुमारे २ कोटी ७५ लक्ष रुपये निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे, यामध्ये धावपट्टी मजबूत करणे, सिमेंट काँक्रिटीकरण करणे,दोन्ही बाजूस भिंत बाधणे तसेच बस डेपो सुधारणा व इतर कामांचा समावेश आहे.

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी रावेतच्या धर्तीवर सुसज्ज असे बस टर्मिनल उभारणार असल्याचे जाहीर करत तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी शेड आणि नियंत्रकाची खोली उभारली. तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्या व्यतिरिक्त महापालिका व पीएमपी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. याठिकाणी चार वर्षांनंतर शौचालयाची व्यवस्था वाढवून पक्क्या बांधकामाच्या दोन खोल्या बांधण्यात आल्या. दरवर्षी पावसाळ्यामध्ये सर्वाधिक दुरवस्था या बस डेपोमध्ये होत असते. पावसाचे पाणी साठून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होत असते. पावसाळ्यात तात्पुरती मलमपट्टी करून काम केले जात असले तरी पावसाळ्यातील दुरावस्थेबाबत प्रचंड नाराजी प्रवासी व वाघोलीतील नागरिकांकडून दरवर्षी व्यक्त करण्यात येते. तात्पुरता बसडेपो उभारून सात वर्ष पूर्ण होत आले असले तरी पायाभूत सुविधा डेपो परिसरात उभारण्याचे कोणतेही काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. अनेक वर्षांपासून राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक व प्रवाशांनी अनेकवेळा वाघोली बस डेपोच्या सुधारणेची मागणी वारंवार केली आहे.
आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या वतीने दोन कोटी ७५ लाख रुपये खर्चून होणाऱ्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, सुनील जाधवराव, बाळासाहेब सातव, करण थोरात, किसन जाधवराव, धर्मेंद्र सातव पाटील, बाळासाहेब शिंदे, प्रसाद केळकर, बाळासाहेब शिवरकर, बिजवंत शिंदे यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या डेपोसाठी उपमुख्यमंत्री , आजि माजी पालकमंत्री, भाजपा, राष्ट्रवादी यासह इतर पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते , नेते, पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.यामुळे या बस डेपोच्या कामाला गती मिळाली आहे.

महानगर पालिकेकडून ५० लाखांच्या निधीची तरतूद –
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी देखील याप्रकरणी पुणे मनपा व पीएमआरडीकडे निधीसाठी मागणी केली होती. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात महानगरपालिकेने देखील या ठिकाणच्या विकास कामांसाठी ५० लाख रुपयांची निधी तरतूद केली आहे. नागरिकांच्या मागणीला आता यश आले असून, लवकरच या परिसरात पीएमआरडीएच्या माध्यमातून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!