Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांचा सणसवाडी ग्रामस्थांकडून सत्कार

आमदार अशोक पवार यांचा सणसवाडी ग्रामस्थांकडून सत्कार

सणसवाडी (ता.शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचे बहुमताने निवड झाल्याबद्दल व शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ राहात अमोल कोल्हे यांना विजयी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवारयांचा वडगाव रासाई येथील देवस्थान पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला.

सणसवाडी ग्रामस्थ व आमदार अशोक पवार व माजी सभापती यांचे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक नाते असून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतात.आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी गावावर व गावाने आमदार पवार दाम्पत्यावर प्रेम केले असून सणसवाडी कर कायमच आदर अशोक पवार यांच्या सोबत राहिले आहेत.

लोकसभेची निवडणूक देशासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असा एक गट व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष झाले यामध्ये आमदार अशोक पवार यांनी ठोस भूमिका घेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहिले पक्षाच्या कठीण व निर्णायक प्रसंगात एकनिष्ठ राहत आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला.

कोल्हे यांच्य विजयात माजी सभापती सुजाता पवार यांची अनमोल भूमिका –  शरद पवार यांच्यावर अढळ निष्ठा ठेवत आमदार अशोक पवार यांच्या सुविद्य पत्नी व माजी सभापती सुजाता पवार यांनी हवेली शिरूर  तालुक्यामध्ये मतदारांच्या घरोघरी पायी जात प्रचार पत्रक वाटत डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली असून अनेक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या सुजाता पवार या लोकांना साद घालण्यात व मतदान मिळवण्यात यशस्वी ठरल्या असून आमदार अशोक पवारांच्या अनेक निवडणुकांमध्ये अचूक नियोजन करत निर्णायक पद्धतीने त्या विजयश्री खेचून आणतात अगदी तसाच शरद पवार यांच्यावरती निष्ठा ठेवून डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी अनमोल भूमिका बजावली यामुळे सणसवाडी करांनी माजी सभापती सुजाता पवार यांची विशेष कौतुक व अभिनंदन केले.

शिरूर लोकसभेला वाजवली तुतारी.. आमदार अशोक पवार लय भारी – आमदार अशोक पवार यांनी कायमच विकासाला व विकासात्मक कामांना महत्त्व दिले. आपल्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण व जीवनाला कलाटणी देणाऱ्या प्रसंगात माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहात अत्यंत कठीण प्रसंगात शरद पवारांवर निष्ठा दाखवत डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार केला. यासाठी रात्रंदिवस कार्यकर्त्यांची फळी बांधली प्रचार योग्य दिशेने करण्यात आला, वाद विवादात न पडता प्रचार व मतदारांच्या मनाला साद घालण्यात आमदार पवार यशस्वी झाले.

   राज्यातील व पक्षाचे मोठे नेते तसेच पाच आमदार  यांना निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचार व मतदानाची टक्केवारीतून  शिरूर लोकसभेला वाजवली तुतारी आमदार अशोक पवार लय भारी हे कृतीतून दाखवले.

 या सर्व राजकीय घडामोडींमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी एकनिष्ठ राहत डॉ अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत प्रामाणिकपणा, एकनिष्ठता जपल्याने सणसवाडी ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!