Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्याअक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्यांनी सजवत आंब्यांची आकर्षक...

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्यांनी सजवत आंब्यांची आकर्षक आरास..

कोल्हापूर – साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जगदंबा देवीला शिवकालीन सोन्याच्या दागिन्यांनी मढवून आंब्याची आरास करण्यास आली. विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी गाभारा उजळून निघाला होता.आई राजा उदे उदे चा गाजर आणि रंगीबेरंगी फुलांचा दरवळ असे भक्तिमय वातावरणात उत्सव पार पडला.

श्री तुळजाभवानी देवीचा दरबार भाविकांनी फुलून निघाला. तुळजाभवानी देवीच्या भोवताली आंब्यांची आरास मांडून पूजा करण्यात आल अक्षय तृतीया निमित्तानं अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्याला आंब्याची आरास करून विशेष पूजा मांडण्यात आली होती. तुळजाभवानी मातेला शिवकालीन सुवर्ण अलंकार घालून देवीसमोर आंब्याची आरास केल्याने तुळजाभवानी देवीचं सौंदर्य अधिक सुंदर आणि गाभारा अधिक आकर्षक दिसत होता. या दुर्मिळ क्षणाचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळे मंदिराचा गाभारा उजळून निघाला होता. एकीकडे शिवकालीन दागिन्यांचा साज, दुसरीकडे घमघमाट सुटलेल्या आंब्याची आरास आणि विविध रंगी फुलांची गाभाऱ्याला करण्यात आलेली आकर्षक सजावट भाविकांचे मन मोहून टाकत होती. 

    आई राजा उदो-उदो चा जयजयकार आणि रंगी बेरंगी फुलांचा मनमोहक दरवळ यामुळे तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने राज्य आणि देशभरातून तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना हा दुर्मिळ क्षण याची देही याची डोळा पाहता आला. अनेक भाविकांनी असे अनमोल दर्शन झाल्यामुळे समाधान ही व्यक्त केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!