छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण राहण्यासाठी व जनतेच्या सेवेचे व्रत अखंडपणे जोपासण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार ग्रंथांची प्रतिमा भेट
ॲड. मोहम्मद शेख

पुणे – दिनांक १७ मार्च
पुणे बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार समारंभ ॲड तौसिफ शेख अँड असोसिएट्स यांच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या वेळी मेमेंटो व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार ग्रंथाची संस्मरणीय भेट देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारांची यथार्थता व सार्थकता प्रतिपादन करताना नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे यांनी ॲड. तौसिफ शेख यांचे कडून छत्रपती शिवाजी महाराज विचार ग्रंथाची भेट खूप मौलिक असून सद्य परिस्थितीत महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त करत ॲड तौसिफ शेख यांच्याविषयी गौरोद्गार काढले. सर्व पदाधिकार्यांनी महाराजांच्या विचार ग्रंथ भेटि बद्दल असोसिएट्सचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमा प्रसंगी पुणे बार असोसिएशनच्या २०२२-२३ चे कार्यकारणीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष ॲड विवेक भरगुडे, ॲड लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड अमोल शितोळे, ॲड सुरेख भोसले व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल ॲड अहमद खान पठाण , डिसीप्लिनरी कमिटी अध्यक्ष ॲड बाळासाहेब खोपोडे , जेष्ठ विधीतज्ज्ञ ॲड शाहीद अख्तर , जेष्ठ विधीतज्ज्ञ ॲड बी.ए. अलूर सर, , शाहिद इनामदार सर, डॉ मिलिंद भोई, फिरोज मुल्ला सर, सदाशिव कुंदेन, प्रा. अमोल लढे, कारी ईद्रीस, संभाजी ब्रिगेड, पुणे ज़िल्हा अध्यक्ष सतीश काळे, मुफ्ती शाहिद, साबीर शेख, आय.टी. शेख,साबीर सय्यद,जमीर मोमीन,सिद्दीक शेख, ॲड मुबशीर, शबाना शेख, भीमराव कांबळे, रफिक शेख, स्वाती गायकवाड तसेच इतर अनेक वकील बंधू व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ॲड.तौसिफ शेख ,ॲड. असोसिएट्सचे ॲड क्रांतीलाल सहाणे, ॲड. स्वप्नील गिरमे,ॲड दिपक गायकवाड, ॲड. मोहम्मद शेख, ॲड शिवानी गायकवाड, ॲड आदिल शेख, ॲड नुपूर अरगडे यांनी केले
समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच आपल्या वकील बांधवांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येत एकीचा संदेश द्यायला हवा. वकिलांच्या अडचणी दूर करणे त्यांना प्रगतीची द्वारे खुली करत त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन तर तरुणांचे सहकार्य मोलाचे आहे. – ॲड.तौसिफ शेख