छत्रपतींच्या महाराष्ट्रात जातीयवादी वृत्तींना थारा नाही – राजेशसिंह ढेरंगे
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या वतीने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या वक्तव्याचा व जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी केली आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर बोलतांना जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांची तातडीने निलंबन करण्यात आले असून वरिष्ठ पातळी वरून याबाबत खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे .मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत असून याबाबत सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.
छत्रपतींचे संस्कार असलेल्या व राजर्षी शाहू ,महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे वक्तव्य केले जाते हे दुर्देवी असून याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्रात जातीयवादी नीच वृत्तींना अजिबात थारा नाही तसेच देशातील कोणत्याही समाजाबद्दल संकुचित मनोप्रवृत्ती व आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा ,एकोपा व बंधुभाव राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार व्हावी व जे पोलीस समजासाठी अहोरात्र कर्तव्य बजावतात त्यांच्याविषयी सन्मान राखायला हवा. एका चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण खात्याला दोष देणे चुकीचे आहे. – राजेशसिंह ढेरंगे,अध्यक्ष स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्ष