Saturday, September 30, 2023
Homeइतरसोशल मीडियावर चुकीचा फोटो टाकणाऱ्या समाजकंटका विरुद्ध पंडित दरेकर यांची तक्रार

सोशल मीडियावर चुकीचा फोटो टाकणाऱ्या समाजकंटका विरुद्ध पंडित दरेकर यांची तक्रार

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)भारतरत्न लता मंगेकर

यांच्या फोटोच्या जागी आशा भोसले यांचा फोटो फोटो टाकण्याचा विकृतीचा लांच्छनास्पद प्रकारकोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) दि . १२ पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांच्या नावे कोणीतरी श्रद्धांजली पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित करत त्यामध्ये लता – मंगेशकर यांच्याऐवजी आशा भोसले यांचा फोटो टाकून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली . ते पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले . मात्र चुकीच्या पद्धतीने पंडित दरेकर यांच्या नावाने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली गेल्याचे समोर आल्याने पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस पंडित दरेकर यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल करीत सदर कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे . याबाबत पंडित दरेकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला असून याबाबत शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या विषयी आम्हाला अत्यंत आदर असून त्यांच्या अलौकिक स्वरांमुळे जीवनात ऊर्जा ,उत्साह आणि आनंद निर्माण होत असतो पण या दुर्देवी घटनेचे सर्वांना दुःख असताना समाज कंटकाने लता दीदींच्या जागी आशा भोसले यांचा फोटो टाकणं दुर्दैवी आहे.या मानसिक विकृतीचा आम्ही निषेध करत असून संबंधितांवर कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. – पंडित दरेकर , सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!