प्रतीनिधी मिलिंदा पवार सातारा

सातारा – दिनांक ६ मार्च
साताऱ्यातील अपशिंगे हे गाव सैनिकांचे गाव म्हणून देशभर प्रसिद्ध असून मिलिटरी अपशिंगे नावाने ओळखलं जाते. या गावात प्रत्येक घरातील एक तरी मुलगा सैन्यात जाऊन देशसेवा करत आहे. या गावात आजवर सुमारे दोन हजार पेक्षा जास्त , आजी-माजी सैनिक आहेत या गावातील तब्बल ९० पेक्षा जास्त जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असून हा पराक्रमाचा , त्यागाचा व बलिदानाचा इतिहास पाहूनच भारतीय सैन्य दलाने या गावाला एक रणगाडा दिल्यामुळे अपशिंगे गावाच्या अस्मितेत व गौरवात मौल्यवान भर पडली युद्धातील स्मृती जपण्यासाठी या गावात रशियन बनावटीचा T-55 रणगाडा दाखल झाला आहे.अशा पद्धतीने रणगाडा मिळालेलं मिलिटरी अपशिंगे हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. त्यामुळे या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या गावातील वीर सुपुत्रांचं सैन्यदलातील योगदान लक्षात घेऊन या गावाला रणगाडा भेट देण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.अमृत जाधव यांनी व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणे येथील दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी केंद्राकडे त्यासाठी मागणी केली होती. अपशिंगे (मिलिटरी) गावाने त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती. सत्ताबदलानंतर साताऱ्याचे विद्यमान पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा सैनिक कल्याण केंद्राच्या माध्यमातून पुन्हा सातत्याने पाठपुरावा केला.मिलिटरी अपशिंगे गावाच्या सुपुत्रांच्या योगदानाचा आदर ठेऊन रशियन बनावटीचा T55 रणगाडा गावाला देण्यात आला. २ मार्च रोजी विशेष लष्करी वाहनाने हा रणगाडा अपशिंगे गावात आणला गेला. रणगाड्याचे गावात ढोल, ताशा, लेझीम, हलगी आणि तुतारीच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये रणगाड्याचे भव्यदिव्य व रोमांचकारी स्वागत करण्यात आले.
या गावातील घरटी सैन्यदलात व्यक्ती आहेत अनेकांनी देशासाठी बलिदान दिले आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक एका गावातील लोक सैन्यदलात आहेत.पहिल्या महायुद्धात या गावातील अनेकांनी सहभाग घेतला होता त्यात सुमारे ४६ जण हुतात्मा झाले होते त्यामुळे ब्रिटिशांनी या गावाला मिल्ट्री अपशिंगे असे संबोधले चे ग्रामस्थ सांगतात.]फोटो ओळ – मिलिटरी अपशिंगे गावात दाखल झालेला रशियन बनावटीचा T55 रणगाडा
