
कोरेगाव भीमा – दिनांक २६ जून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज दिंडी सोहळ्यातीलसाई श्रध्दा प्रासादिक अन्नदान दिंडी सोहळ्यास केडगाव ( ता.दौंड ) येथे समाजसेविका प्रीती चव्हाण व सहकाऱ्यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा केडगाव चौफुला येथे करंदी ग्रामस्थ, महिला अन्याय मुक्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रीती चव्हाण व सहकाऱ्यांच्या मार्फत अन्नदान करण्यात आले. यावेळी करंदी ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी उत्तम व स्वादिष्ट भोजन व्यवस्था केली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष – हारिभक्त परायण पांडुरंग दरेकर , प्रताप वर्पे ,अजित दरेकर , काकासाहेब काटे, संस्थापक विश्वस्त महिला अन्याय मुली मंच सोमनाथ चव्हाण,दादासाहेब कराळे ,दिलीप दरेकर ,रविंद्र कराळे ,भाऊसाहेब बांगर ,पप्पु मांडे, मल्हारी औटे,बाजीराव दरेकर ,बाळासाहेब गायकवाड, दादा सासवडे, समीर दरेकर , रखमाबाई दरेकर, रंभाबाई ढोकले, बारकाबाई दिघे ,भाऊसाहेब माने ,दत्तात्रय सोनवणे, आबा ढोकले ,एकनाथ चव्हाण , अनिल खेडकर उपस्थित होते.