सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनासह विद्यार्थ्यां व विद्यार्थिनींना गुलाब पुष्प खाऊ वाटप
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)येथे शालेय विद्यार्थि व विद्यार्थिनींचे पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले. यावेळी सरस्वती पूजन करण्यात आले. सणसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी व सणसवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस असल्याने लहान मुलांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला होता. नवीन शालेय गणवेश, दप्तर ,पुस्तके वह्या यांसह सुंदर हसरा निरागस चेहरा त्यावर असणारा निखळ आनंद , छोटी छोटी चिमुकली बागडणारी दुडूदुडू चालणारी पाऊले यामुळे शाळेचे प्रांगण सुखद व आनंददायी वातावरण भारावून गेले होते अनेकजण आपल्या बालमित्र मैत्रिणींना भेटण्याच्या आनंदाने भारावून गेले होते.

सणसवाडी येथील गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी या दोन्ही शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीच्या कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे प्रांगण गजबजून गेले होते.
शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यांसाठी प्रत्येक मुलाला एक गुलाब पुष्प देऊन,मुलांना मोफत गणवेश वाटप, वह्या पुस्तके वाटप करून त्यांचे शाळेमध्ये स्वागत आले. त्याचप्रमाणे विद्यार्थी – विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व प्रेरणादायी करण्यात आला.

याप्रसंगी सणसवाडी गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर ,ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग ,सर्व विद्यार्थी ,आणि पालक वर्ग ,मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आले
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी येथील स्वागत प्रसंगी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, मोहन हरगुडे, तनुजा दरेकर, ललिता दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, दगडू दरेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक संतोष गोसावी व सर्व शिक्षकवृंद ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी येथील स्वागत प्रसंगी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, ॲड विजयराज दरेकर,आजी उपसरपंच सागर दरेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दरेकर, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक भंडारे सर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यात आला.
शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व शिक्षकांचे मोठे सहकार्य असून पालकांनीही याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत मुलांचे उज्वल भविष्य घडवायला हवे.- सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, सणसवाडी ग्राम पंचायत