कर्मचारी महिलांना साडी वाटप करत केला सन्मान

पुणे – दिनांक ८ मार्च
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येत असताना आपल्या कुटुंबाच्या व परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेत आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या स्वच्छतादूत महिला भगीनिंचा सन्मान भारतीय माहिती सेवा समिती पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारती रोहिदास कामठे यांच्या वतीने सफाई कर्मचारी महिलांना साडी वाटप करून करण्यात आला.
आपण कोणतेही सार्वजनिक उपक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात करत असतो पण त्यानंतर तिथे जमा होणारा कचरा याच भगिनि साफ करून स्वच्छता ठेवतात ,रस्ते ,परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम महिला भगिनी करतात त्यांचा सन्मान होणे अत्यंत महत्वाचे असून समाजात कोणतेही काम छोटे अथवा मोठे नाही तर त्यामागील सामाजिक कल्याणाची व सुरक्षिततेची भावना मोठी आहे . – भारती रोहिदास कामठे महिलाध्यक्ष पुणे जिल्हा , अखिल भारतीय माहिती सेवा समिती