
कोरेगाव भीमा – दिनांक २६ फेब्रुवारी
सणसवाडी ( ता.शिरूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर ,खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार ॲड अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचा शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांसाठी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कृष्णलीला गार्डन कार्यालय सणसवाडी येथे सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुटुंबातील प्रत्येक घटकाचा विचार व प्रगतीसाठी जसे कुटुंबप्रमुख , जबाबदार कुटुंबवत्सल भावंडांचा सहभाग ,मार्गदर्शन महत्वाचे असते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जिवाभावाचे कुटुंब असून कुटुंबातील प्रत्येकाशी घरातील व्यक्तीशी सुसंवाद साधण्यासाठी ,त्याच्या अडचणी ,सुख दुःख समजून घेण्यासाठी व त्याच्या प्रगतीसाठी,सक्षमतेसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.- आमदार ॲड अशोक पवार
