कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कालभैरवनाथ महाराजांच्या वर्धापन दिन महोत्सवास मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची महापूजा ,गणपती पूजन,होमहवन होणार असून ग्राम पुरोहित महेश सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.सायंकाळी ७ ते ९ यावेळेत बाळू महाराज गिरगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर माजी उपसरपंच शिवाजी दरेकर यांच्यावतीने महाप्रसादाचे अन्नदान होणार आहे तर दोन्ही दिवस संध्याकाळी भैरवनाथ भजनी मंडळ व पांडुरंग सेवा भजनी मंडळ यांची भजन सेवा होणार आहे.
मंदिरांची आकर्षक फुलांची सजावट उपसरपंच दत्तात्रय नामदेव हरगुडे यांच्यावतीने करणारा आली आहे.

दुसऱ्या दिवशी दिनांक २४ फेब्रुवारी श्रींचा अभिषेक त्यानंतर भैरवनाथ महराजांचे पारंपरिक भराडाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्रींचा पालखी मिरवणूक सोहळा होणार आहे.यावेळी रगडा खेळ झांजपथक, बँड व ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक सोहळा होणार आहे.संध्याकाळी प्रसिद्ध कीर्तनकार संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन माजी उपसभापती आनंदराव हरगुडे व माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,रामदास दरेकर,दगडू दरेकर,,माजी ग्राम पंचायत सदस्य कुंदा हरगुडे,निवृत्ती हरगुडे, संदीप भुजबळ, किसन हरगुडे,दिगंबर हरगुडे, संतोष दरेकर ,संतोष शिवले, काळूराम हरगुडे,पप्पू दरेकर,सुनील भोसुरे यांच्यासह अनेक मान्यवरांचे अनमोल योगदान लाभले. कार्यक्रमाचे सुरेख व देखणे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.भैरवनाथ भजनी मंडळ व पांडुरंग सेवा भजनी मंडळ यांची भजन व दिंडी मंडळ सप्ताह मंडळाने सहयोग केला.